postbox media

Tuesday 1 October 2019

खाद्यसंस्कृती - फिंगर चिप्स




नमस्कार 


आज आपण बघुया उपवासासाठी खास फिंगर चिप्स

साहित्य
साल काढलेले मोठे बटाटे
मीठ
तेल
पाणी

कृती
१)पाण्यात मीठ घालून पाणी उकळवून घ्या.
२) बटाट्याचे साधारण १सेमी जाडीचे उभे काप करून घ्यावे आणि हे काप पाण्यात बुडबून ५ मिनिटे ठेवावे
३)कढईत तेल तापायला ठेवा, तेल चांगले तापायला हवे.
४)बटाट्याचे काप एका कापडाने स्वच्छ पुसून घ्यावे आणि गरम तेलात थोडे थोडे सोडावेत.
५)सुरवातीला कढईत फेस येईल व हळू हळू काप हलके होतील.
६)काप हलके आणि थोडे ब्राऊन झाले कि तेल निथळून ते पेपर वर ठेवा म्हणजे जास्तीचे तेल शोषले जाईल.
७)त्यात नंतर मीठ घालून हलवा .
आपले फिंगर चिप्स तयार 



 वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com


खाद्यसंस्कृती - रताळ्याची खीर


 



।।सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वाथ साधिके शरण्ये त्रंबकेगौरी नारायणी नामोस्तुते ।।

सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा
आज आपण गोडाची रेसिपी बघुया की जी पौष्टिक पण आहे आणि उपवासाला खत येऊ शकते
आज आपण बघुया रताळ्याची खीर

साहित्य:-
१/२ किलो रताळी
१/२वाटी साखर
१/२ लिटर दूध
१चमचा साजूक तूप
१/२वेलची पूड
बदामाचे काप

कृती:-
१) रताळी स्वच्छ धुवून घ्या आणि कुकरमध्ये २शिट्या काढून घ्या.
२)एका पातेल्यात १चमचा साजूक तूप घेऊन त्यात कुस्करलेले रताळे थोडे परतून घ्या त्यात साखर घाला .
साखर विरघळली की त्यात दूध घालून मंद आचेवर गरम करा
साधारण एक उकळी आली की गॅस बंद करा आणि वेलचीपूड, बदामाचे काप घाला
आपली रताळ्याची खीर तयार.

वैभव जगताप  


https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - कांदाभजी






नमस्कार


बाहेर छान पाऊस पडतो आणि पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाही त्यातच लेकीचा आग्रह भजी बनव, पाऊस म्हटलं तर कांदाभजी ही आलीच पाहिजे चला तर आज आपण बनवूया कांदा भजी

साहित्य:
२ कांदे उभे पातळ चिरलेले
१ चमचा लाल तिखट
१/२ चमचा हळद
१/२चमचा साखर
१ चमचा तांदळाचं पीठ
१/२वाटी बेसन (साधारण)
१ टीस्पून कडकडीत तेलाचे मोहन
तेल

कृती:
१)एका भांड्यात उभा चिरलेला कांदा घ्या त्यात मीठ घालून
कांदा चुरायाचा १० मिनिटे तसाच कांदा ठेऊन दया .म्हणजे त्याला थोडे पाणी सुटेल
२)त्यात साखर,हळद तिखट ,बेसन आणि तांदळाचे पीठ घालून हाताने एकजीव करा.
३) बेसन कांदयात मावेल एवढं घालावं
४) कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले कि १ चमचा गरम तेल मिश्रणात घाला आणि परत सगळे मिश्रण एकजीव करून घ्या.
कढईत थोड्या थोड्या अंतरावर भज्या सोडा मंद आचेवर लालसर होई पर्यंत तळा.
आपली कांदा भजी तयार

टीप:
१)कांदयात मावेल इतकेच बेसन घाला. जास्ती बेसन घातले तर भजी आतून कच्ची राहील आणि कुरकुरीत होणार नाही
२) आवडत असेल तर थोडी ताजी कोथिंबीर बारीक चिरून घालावी खूप स्वादिष्ट लागते .






वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - बीटाची कोशिंबीर


 
 
 
 
 
नमस्कार

आज आपण बघुया अगदी झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी बीटाची कोशिंबीर

साहित्य:
१बीट किसलेलं
१कांदा बारीक चिरलेला
१टोमॅटो बारीक चिरलेला
१/२ चमचा जिरेपूड
१ चमचा शेंगदाणा कूट
कोथिंबीर बारीक चिरलेली
१-२मिरच्या मध्यम कापलेल्या
१ चमचा लिंबाचा रस
मीठ
साखर

कृती:
१) बिट शक्यतो कच्चेच घ्यावे, पण कच्च्या बिटाची चव आवडत नसेल तर कूकरमध्ये १ शिट्टी करून अगदी थोडेच शिजवून घ्यावे. जास्त शिजवू नये.
२) एका भांड्यात किसलेलं बिट,टोमॅटो, कांदा,मिरची,जिरं पूड,कोथिंबिर, मीठ,साखर, लिंबाचा रस, शेंगदाण्याचा कूट घालून सगळे एकजीव करावे
आपली बीटाची कोशिंबीर तयार

टीप:-
१) जर कोशिंबीर मध्ये दही आवडत असेल तर ह्यात घालू शकतो .
 

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - छोले मसाला





नमस्कार

आज आपण बघुया छोले मसाला

साहित्य:-

१ वाटी काबुली चणे (८-९ तास भिजवलेले)
२ -३ चमचे आलं लसूण पेस्ट
१ तमाल पत्र
३-४ लवंगा
१ " दालचिनीचा तुकडा
२कांदे बारीक चिरलेली
१ टोमॅटो बारीक चिरलेला
२उकडलेले बटाटे (कुस्करलेले)
१/२चमचा गरम मसाला
१ १/२ चमचा लाल तिखट
१/४ चमचा आमचूर
१/४ चमचा धणे जिरं पूड
१/४ कप चहाचे पाणी (रंग येण्यासाठी)
मीठ
तेल/ तूप
पाणी

कृती :
१) भिजवलेले छोले कुकरमध्ये थोडे मीठ घालून मऊसर शिजवून घ्या.
२) एका बाजूला एका पातेल्यात १कप पाणी घेऊन त्यात १चमचा चहा पावडर घालून चहाचे पाणी करून घ्या.
३)एका कढईत तुप गरम करा. तुपात लवंगा,दालचिनी तमाल पत्रआणि जिरं फोडणीला घाला. नंतर लसूण पेस्ट आणि कांदा घाला. खमंग वास सुटला कि टोमॅटो, हळद, तिखट ,गरम मसाला, आमचूर, धणे जिरंपूड आणि मीठ घालून तेल सुटेपर्यंत परता.
४)उकडलेले छोले आणि चहाचं पाणी घालून चांगली एक उकळी येऊ दयात
५) कुस्करलेला बटाटा घालावा .
६)आवडीप्रमाणे पाणी घालून पात्तळ करा.थोडावेळ उकळू द्या.
७)गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालून सजवा.

टीप :
१)चहाचे पाणी घातल्याने छान रंग येतो आणि चवही छान येते.किंवा छोले उकडताना एका कापडी फडक्यात चहा पावडर घालून त्याची पुरचुंडी करा आणि ती छोल्या मध्ये ठेवावी.
२) छोल्याची ग्रेव्हीलाजरा दाटपणा येण्यासाठी त्यात बटाटा कुस्करून घातलेला आहे
ग्रेव्ही दाट होण्याकरिता उकडलेल्या छोल्या पैकी मूठभर छोले मिक्सर मधून काढले तरी चालतील






वैभव जगताप 

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - स्पेशल मटण मसाला







नमस्कार,


आज आपण बघुया रविवार स्पेशल मटण मसाला

साहित्य:-
१/२ किलो मटण
४कांदे उभे चिरलेले वाटणासाठी
१कांदा बारीक चिरलेला(फोडणी साठी)
१/२ वाटी खोबरं
१टोमॅटो
१वाटी दही
२-३हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
१/२इंच आलं
८-१० पाकळ्या लसूण
२पाने तमालपत्र
४-५काळी मिरी
२-३लवंगा
१चक्रीफुल
पाव चमचा खसखस
१/२ चमचा बडीशोप
१/२ इंच दालचिनी चा तुकडा
१चमचा हळद
२चमचे मालवणी मसाला
तेल
पाणी
मीठ

कृती:-
१) प्रथम मटण ३-४पाण्यातून स्वच्छ धुवून काढावेत
२) आलं,लसूण ,मिरची,कोथिंबीर आणि थोडं पाणी घालून हिरव वाटण करून घ्यावे.
३) धुतलेल्या मटणाला हळद,हिरवं वाटण,थोडं मीठ,दही,१चमचा तेलआणि १चमचा मसाला लावून
अर्धा तास मुरत ठेवा
४) कांदा खोबरं आणि टोमॅटो तेलावर चांगलं भाजून घ्या . चांगलं भाजून झालं की त्यात काळेमीर,चक्रीफूल,दालचिनी,लवंग,बडीशेप, खसखस,आणि वेलची घालून जरा परतून घ्यावं
आणि मिक्सर मधून थोडं पाणी घालून वाटून घ्यावे.
५)एका प्रेशरपॅन किंवा कुकर मध्येये ४-५चमचे तेल घाला,तेल तापले की त्यात तमालपत्र घाला त्यावर बारीक चिरलेला कांदा घाला . कांदा गुलाबी झाला की त्यात १चमचा मसाला घाला आणि लगेच वाटलेलं वाटण घालुन परतून घ्यावे .
एक वाफ आली की त्यात मटण घालावे आणि वरून थोडे मीठआणि पाणी घालावे
७-८ शिट्या काढाव्यात (मटण शिजायला थोडा वेळ लागतो)
गॅस बंदकेल्यावर साधारण १०- १५ मिनिटं मटण मुरू द्यात
मटण मसाला तयार

टीप:-
१) जर खडा गरम मसाला नसेल तर गरम मसाला पावडर वापरली तरी चालेल साधारण १चमचा.
ताजे मसाले कुटले तर स्वाद जास्त छान येतो.
२)झणझणीत हवे असल्यास थोडा जास्त मसाला घालावा.




 वैभव जगताप  

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - फ्लॉवर मटार बटाटा रस्सा भाजी








नमस्कार,


फ्लॉवर मटार बटाटा रस्सा भाजी

साहित्य:

फ्लॉवरचे ८ ते १० मध्यम तुरे
१वाटी मटार
२बटाटे मध्यम आकाराचे कापलेले
१ मोठा कांदा उभा चिरलेला
१बारीक चिरलेला
१/२ वाटी खोबरं
४ ते ५ लसूण पाकळ्या
१ टोमॅटो बारीक चिरलेला
४-५ पाने कडीपत्ता
१चमचा मालवणी मसाला
१/२ चमचा गरम मसाला
१ चमचा राई
१/२ चमचा जिरं
पाव चमचा हिंग
१/२ चमचा हळद
कोथिंबीर
मिठ
पाणी
तेल

कृती:-
१) कढईत २चमचे तेल घ्या त्यात उभा चिरलेला कांदा घाला .कांदा लालसर झाला की त्यात खोबरं घाला .
खोबरं लालसर होईपर्यंत नीट भाजून घ्या.
मिक्सरमध्ये भाजलेला कांदा खोबरं,लसूण,कोथींबीर आणि थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या.
२) एका कढईत २चमचे तेल गरम करावे त्यात राई, जिरे, हिंग, हळद आणि कढीपत्ता पाने घालून फोडणी करावी.
त्यात बरीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घाला ,त्यांचा रंग बदलला कि त्यात मालवणी मसाला आणि गरम मसाला घालावा आणि लगेच वाटलेले वाटण घालून सगळे एकजीव करावे आणि थोडं पाणी घालावे,एक वाफ आली की त्यात बटाटे ,आणि मटार घालावा बटाटे साधारण शिजल्यासारखा वाटलं की नंतर त्यात फ्लॉवर आणि चवीपुरतं मीठ घालावं.
आपली फ्लॉवर मटार बटाटा रस्सा भाजी तयार 



 मायरा वैभव जगताप  

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - कोळंबी मसाला





नमस्कार 


आज आपण बघूया कोळंबी मसाला

साहित्य:
मध्यम आकाराच्या कोलंब्या १५-२०
१ १/२ कांदा उभा चिरलेला (वाटणा साठी)
१/२ कांदा बारीक चिरलेला(फोडणीसाठी)
१/२ वाटी किसलेलं सुकं खोबरं
१ चमचा गरम मसाला
४-५ लसूण पाकळ्या
१/२ इंच आल्याचा तुकडा
१/२ चमचा हळद
१ चमचा मालवणी मसाला
२-३ कोकम
कोथिंबीर
२हिरव्या मिरच्या
मीठ
तेल
पाणी

कृती:-
१) कोलंबीचा धागा आणि कवच काढून साफ करून घ्या.
२) एका कढईत २चमचे तेल घ्या वाटणासाठीचा कांदापरतून घ्या ,कांदा लाल झाला की त्यात खोबरं घाला आणि चांगले भाजून घ्या .
नंतर त्यात लसूण,आलं,मिरचीआणि कोथिंबीर घालून सगळं मिक्सरमध्ये घालून थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या.
३) पातेल्यात तेल गरम करा आणि बारीक चिरलेला कांदा २-३ मिनिटे परतून घ्या. नंतर हळद ,मालवणी मसाला,गरम मसाला आणि वाटण घालून २-३ मिनिटे परता.
४)चवीपुरते मीठ आणि कोकम घाला. २-३उकळ्या आल्या की त्यात कोळंबी सोडा.झाकण ठेवून कोलंबी व्यवस्थित शिजवा.
आपला कोळंबी मसाला तयार .



  वैभव जगताप 

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - वांग्याचे काप






वांग्याचे काप 



साहित्य :
१ मध्यम वांगे
१/२ वाटी तांदूळ पीठ
१चमचा बेसन पीठ
२ चमचे लाल तिखट
१/४ चमचा हळद
चिमूटभर हिंग
१/२ चमचाजीरेपूड
१/२ चमचाधणेपूड
मीठ
तेल

कृती :
१) वांग्याच्या गोल चकत्या कराव्यात. ८-१० मिनिटे मिठाच्या पाण्यात भिजत ठेवावे.
२) पाण्याबाहेर काढून वांग्यावरील पाणी टिपून घ्यावे.
३)एका भांड्यात बेसन, तांदूळ पीठ, हळद, तिखट, हिंग, चवीपुरते मीठ, जीरेपूड, धणेपूड एकत्र करावे. (पाणी अजिबात घालू नये)
४) काप दोन्ही बाजूंनी वरील मिश्रणात घोळवून घ्यावे.
५) नॉन स्टिक तव्यावर २-३ चमचे तेल घालावे आणि काप तव्यावर ठेवावे. मध्यम आचेवर वरुन झाकण ठेवून काप शिजू द्यावेत. बाजूने थोडे तेल सोडावे.
६) ३-४ मिनिटांनी सुरीने काप शिजले आहेत की नाही ते बघावे.
७) एक बाजू गोल्डन ब्राऊन झाल्यावर काप दुसर्‍या बाजूवर परतावे.






वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - दही वडे


नमस्कार,

दही वडे




साहित्य :-
★वड्यांसाठी:-
२वाट्या उडदाची डाळ
१/४ वाटी ओल्या खोबर्याचे पातळ तुकडे
४-५ मिरं
२ कप पातळ ताक
मीठ
तेल
★दही बनवण्यासाठी:-
२वाट्या दही,
५-६ चमचे साखर,
कणभर मिठ
★वरून भुरभूरवण्यासाठी:-
मिरपूड,
लाल तिखट,
चाट मसाला
कोथिंबीर
शेव

कृती:
१) उडीद डाळ पाण्यात ४-५ तास भिजत घालावी. पाणी काढून टाकावे. अगदी थोडेसेच पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी. नंतर त्यात मिठ, ठेचलेले मिरं, आणि खोबर्याचे पातळ काप घालावेत.
२) वडे मध्यम आचेवर गोल आकारात किंवा मेदूवड्याच्या आकारात तळून घ्यावे.
३) पातळ ताकात थोडी साखर आणि किंचीत मिठ घालावे. यामध्ये तळलेले वडे साधारण अर्धा ते एक तास बुडवून ठेवावे.
४) एका वाडग्यात दही घ्या आणीत ते रवी ने चांगले घुसळून घ्या. त्यात चवीनुसार साखर आणि मिठ घालावे आणि थोडावेळ फ्रिजमध्ये गार करण्यास ठेवावे.
सर्व्ह करताना ताकात भिजवलेले वडे प्लेटमध्ये घालावेत. त्यावर दही घालून वरती चाट मसाला, मिरपूड,लाल तिखट,कोथिंबीर आणि शेव घालावी.
दहिवडे तयार. 




मायरा वैभव जगताप
https://www.postboxmedia.wordpress.com