postbox media

Tuesday, 1 October 2019

खाद्यसंस्कृती - दही वडे


नमस्कार,

दही वडे




साहित्य :-
★वड्यांसाठी:-
२वाट्या उडदाची डाळ
१/४ वाटी ओल्या खोबर्याचे पातळ तुकडे
४-५ मिरं
२ कप पातळ ताक
मीठ
तेल
★दही बनवण्यासाठी:-
२वाट्या दही,
५-६ चमचे साखर,
कणभर मिठ
★वरून भुरभूरवण्यासाठी:-
मिरपूड,
लाल तिखट,
चाट मसाला
कोथिंबीर
शेव

कृती:
१) उडीद डाळ पाण्यात ४-५ तास भिजत घालावी. पाणी काढून टाकावे. अगदी थोडेसेच पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी. नंतर त्यात मिठ, ठेचलेले मिरं, आणि खोबर्याचे पातळ काप घालावेत.
२) वडे मध्यम आचेवर गोल आकारात किंवा मेदूवड्याच्या आकारात तळून घ्यावे.
३) पातळ ताकात थोडी साखर आणि किंचीत मिठ घालावे. यामध्ये तळलेले वडे साधारण अर्धा ते एक तास बुडवून ठेवावे.
४) एका वाडग्यात दही घ्या आणीत ते रवी ने चांगले घुसळून घ्या. त्यात चवीनुसार साखर आणि मिठ घालावे आणि थोडावेळ फ्रिजमध्ये गार करण्यास ठेवावे.
सर्व्ह करताना ताकात भिजवलेले वडे प्लेटमध्ये घालावेत. त्यावर दही घालून वरती चाट मसाला, मिरपूड,लाल तिखट,कोथिंबीर आणि शेव घालावी.
दहिवडे तयार. 




मायरा वैभव जगताप
https://www.postboxmedia.wordpress.com

No comments:

Post a Comment