वांग्याचे काप
साहित्य :
१ मध्यम वांगे
१/२ वाटी तांदूळ पीठ
१चमचा बेसन पीठ
२ चमचे लाल तिखट
१/४ चमचा हळद
चिमूटभर हिंग
१/२ चमचाजीरेपूड
१/२ चमचाधणेपूड
मीठ
तेल
कृती :
१) वांग्याच्या गोल चकत्या कराव्यात. ८-१० मिनिटे मिठाच्या पाण्यात भिजत ठेवावे.
२) पाण्याबाहेर काढून वांग्यावरील पाणी टिपून घ्यावे.
३)एका भांड्यात बेसन, तांदूळ पीठ, हळद, तिखट, हिंग, चवीपुरते मीठ, जीरेपूड, धणेपूड एकत्र करावे. (पाणी अजिबात घालू नये)
४) काप दोन्ही बाजूंनी वरील मिश्रणात घोळवून घ्यावे.
५) नॉन स्टिक तव्यावर २-३ चमचे तेल घालावे आणि काप तव्यावर ठेवावे. मध्यम आचेवर वरुन झाकण ठेवून काप शिजू द्यावेत. बाजूने थोडे तेल सोडावे.
६) ३-४ मिनिटांनी सुरीने काप शिजले आहेत की नाही ते बघावे.
७) एक बाजू गोल्डन ब्राऊन झाल्यावर काप दुसर्या बाजूवर परतावे.
वैभव जगताप
https://www.postboxmedia.wordpress.com
No comments:
Post a Comment