postbox media

Tuesday, 1 October 2019

खाद्यसंस्कृती - छोले मसाला





नमस्कार

आज आपण बघुया छोले मसाला

साहित्य:-

१ वाटी काबुली चणे (८-९ तास भिजवलेले)
२ -३ चमचे आलं लसूण पेस्ट
१ तमाल पत्र
३-४ लवंगा
१ " दालचिनीचा तुकडा
२कांदे बारीक चिरलेली
१ टोमॅटो बारीक चिरलेला
२उकडलेले बटाटे (कुस्करलेले)
१/२चमचा गरम मसाला
१ १/२ चमचा लाल तिखट
१/४ चमचा आमचूर
१/४ चमचा धणे जिरं पूड
१/४ कप चहाचे पाणी (रंग येण्यासाठी)
मीठ
तेल/ तूप
पाणी

कृती :
१) भिजवलेले छोले कुकरमध्ये थोडे मीठ घालून मऊसर शिजवून घ्या.
२) एका बाजूला एका पातेल्यात १कप पाणी घेऊन त्यात १चमचा चहा पावडर घालून चहाचे पाणी करून घ्या.
३)एका कढईत तुप गरम करा. तुपात लवंगा,दालचिनी तमाल पत्रआणि जिरं फोडणीला घाला. नंतर लसूण पेस्ट आणि कांदा घाला. खमंग वास सुटला कि टोमॅटो, हळद, तिखट ,गरम मसाला, आमचूर, धणे जिरंपूड आणि मीठ घालून तेल सुटेपर्यंत परता.
४)उकडलेले छोले आणि चहाचं पाणी घालून चांगली एक उकळी येऊ दयात
५) कुस्करलेला बटाटा घालावा .
६)आवडीप्रमाणे पाणी घालून पात्तळ करा.थोडावेळ उकळू द्या.
७)गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालून सजवा.

टीप :
१)चहाचे पाणी घातल्याने छान रंग येतो आणि चवही छान येते.किंवा छोले उकडताना एका कापडी फडक्यात चहा पावडर घालून त्याची पुरचुंडी करा आणि ती छोल्या मध्ये ठेवावी.
२) छोल्याची ग्रेव्हीलाजरा दाटपणा येण्यासाठी त्यात बटाटा कुस्करून घातलेला आहे
ग्रेव्ही दाट होण्याकरिता उकडलेल्या छोल्या पैकी मूठभर छोले मिक्सर मधून काढले तरी चालतील






वैभव जगताप 

https://www.postboxmedia.wordpress.com

No comments:

Post a Comment