postbox media

Thursday, 3 October 2019

खाद्यसंस्कृती - मालपुआ



 
 
 
 
नमस्कार 
 
 
आज आपण बघुया झटपट मालपुआ

साहित्य :
२वाटी मैदा
3 वाटी दूध
२कुस्करलेली केळी
२ चमचे किसलेलं खोबरं
१ चमचा रवा
२ चमचा साखर
3वाटी पाणी
४ वेलदोडे
. १कप तुप.

कृती :
१)सगळं साहित्य एकत्र करून मालपुआचं पीठ तयार करा. २)साखर आणि पाणी मिसळून पाक बनवा. कढईत तुप घालून मालपुए तळून घ्या. एका ताटात काढून घ्या. वाढण्याआधी पाक गरम करा. मालपुआंना पाकात बुडवा आणि सर्व्ह करा.
 



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - सुका जवळा




नमस्कार 


आज आपण बघुया सुका जवळा

साहित्य
२-३ वाटे जवळा
५-६ लसूण पाकळी ठेचलेली
२कांदे बारीक चिरलेले
१चमचा मालवणी मसाला
१/२ चमचाहळद
२-४ कोकमं
१/२वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली
मीठ
तेल

कृती-:
१) जवळा निवडून स्वच्छ करावा . नंतर तो जवळा तव्यावर थोडा भाजून घ्यावा व त्यानंतर स्वच्छ धुवावा. पाणी निपटून टाकावे.
२)पातेल्यात २-३ चमचे तेल घेऊन ठेचलेला लसूण आणि कांद्याची फोडणी करावी. कांदा छान लालसर परतावा
सुका जवळा टाकावा. मिश्रण थोडा वेळ चांगले परतून घ्यावे, जवळा शिजू द्यावा. नंतर त्यात आमसूल, मालवणी मसाला व चवीनुसार मीठआणि कोथंबीर घालून मिश्रण पुन्हा परतावे व सारखे करून घ्यावे.



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - मेथी मलाई मटार




नमस्कार 


बाजारात मेथी आणि मटार जास्त प्रमाणात बघितले जातात तर चला मग आज आपण बघुया मेथी मलाई मटार

साहित्य:
१जुडी मेथीची फक्त पाने
१/२ वाटी मटार
१ हिरवी मिरची
१ कांदयाची पेस्ट
१ चमचा बटर
२ काळ्या मिरी
१ वेलची
१ लहान दालचिनीचा तुकडा
१/२ पेला दुध
मिठ

कृती:
१) कढईत बटर गरम करावे त्यात हिरवी मिरची घालून काही सेकंद परतावे. नंतर मिरी, वेलची आणि दालचिनीचा तुकडा घालून त्यांचा छान वास येईस्तोवर परतावे.
२) या फोडणीत कांद्याची पेस्ट घालावी. मध्यम आचेवर परतावे. कांद्यातील सर्व पाणी निघून जाऊन कांदा शिजला कि त्यात धुवून स्वच्छ केलेली मेथीची पाने घालावीत. मध्यम आचेवर मेथी परतावी. शिजवताना कढईवर झाकण ठेवू नये, मेथीचा रंग बदलतो.
३) पाने थोडी शिजली कि त्यात मटार आणि दूध घालावे आणि मंद आचेवर शिजवावे. चवीनुसार मिठ घालावे. १ ते २ टेस्पून क्रिम घालावे आणि थोडावेळ मंद आचेवर शिजवावे.
हि भाजी छान मिळून यायला वेळ लागतो त्यामुळे शिजवताना घाई करू नये.

टीप:
१) आलेलसूण पेस्ट आवडीनुसार फोडणीत घालू शकतो.परंतु, त्यामुळे मेथीचा स्वाद एकदम कमी होतो आणि भाजी तेवढी चविष्ट लागत नाही.मेथी चा फ्लेवर जातो
२) फ्रेश क्रिममुळे भाजीला थोडी गोडसर चव येते. पण वाटल्यास चिमूटभर साखर घालावी.

 

मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - आलेपाक






नमस्कार,



बाहेर मस्त थंडी पडली आहे आणि त्यात सर्दी खोकल्यामध्येये ही भर पडलीच आहे . पूर्वी थंडीला सुरुवात झाली की घरोघरी बनणारी एकच गोष्ट ती म्हणजे आलेपाक
चला तर बघुया आलेपाक कसा बनवायचा

साहित्य:
आले सोलून व चिरून- १ कप
२ वाट्या साखर
१/२वाटी सायीसकट दुध
१ छोटा चमचा तूप

कृती:
१)आले अगदी थोडं पाणी वापरून गुळगुळीत मिक्सरवर वाटून घ्या.
२)एका चौकोनी बर्फी ट्रे किंवा ताटाला तुपाचा हात फिरवून घ्या.
३)एका जाड बुडाच्या किंवा नॉन-स्टीक पॅनमध्ये वाटलेले आले, साखर आणि दुध एकत्र करा.
मध्यम आचेवर ठेवून सतत हलवत रहा. हळूहळू साखर वितळून घट्ट होऊ लागेल.
४)लक्ष्यपूर्वक ढवळत राहा. मिश्रण भांड्याच्या कडेपासून सुटू लागेल. याचा अर्थ ते तयार आहे. गॅस बंद करा.
५)मिश्रण ट्रे मध्ये ओतून गरम सुरीने चौकोनी तुकडे पाडा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या करा.
हवाबंद डब्यात भरून ठेवा.
 



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - चहाचा मसाला




नमस्कार,



बाहेर मस्त थंडी पडली आहे अशा वेळी मसाला चहा ची चवचं काही न्यारी चला तर आज आपण बघुया चहाचा मसाला काय बनवायचा .

साहित्य:
४० वेलची
२५ काळी मिरी
१५ ते १८ लवंग
५ काड्या दालचिनी (२ इंच प्रत्येकी)
१ टेस्पून सुंठ पावडर
३/४ जायफळ किसलेले

कृती:
१) दालचिनी हाताने तुकडे करून घ्यावी.
२) वेलची साला सहित वापरवी
३) सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करावे.

वापर:-
४ कप चहासाठी दीड ते दोन छोटा चमचा मसाला वापरावा. चहा पावडरबरोबरच हा मसाला घालावा. चहा उकळल्यावर आच बंद करून मिनिटभर झाकण ठेवावे. यामुळे मसाल्याचा स्वाद चहामध्ये चांगला मुरेल.

टीप:-
१) काळीमिरी, वेलची, दालचिनी आणि सुंठ यांची फ्रेश पावडर वापरूनही मसाला बनवू शकतो. जर दालचिनीचा स्वाद आवडत असेल तर ती थोडी जास्त घालावी.
२) चहाच्या मसाल्यात वाळवलेली चहाची पाती, बडीशेप आणि थोड्याशाच प्रमाणात चक्रीफूल घालू शकतो.
 



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - स्वीट कॉर्न




नमस्कार,

आज आपण बघुया काहीतरी चटपटीत पदार्थ
चटपटा स्वीट कॉर्न

साहित्य :
२वारी स्वीट कॉर्न
१/४ वाटी कोथिंंबीर बारीक चिरलेली
१ छोटा कांदा बारीक चिरलेला
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१ छोटा टोमॅटो बारीक चिरलेला
१/४ चमचा मिरे पावडर
१/४ चमचा चाट मसाला
१ छोटे लिंबू रस
१ चमचा बटर
मीठ

कृती :
१)कुकरमध्ये एक शिट्टी देऊन मक्याचे दाणे थोडे उकडून घ्यावे.
२)कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
३)एका कढई मध्ये बटर गरम करून कांदा व हिरवी मिरची घालून थोडे गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. मग त्यामध्ये शिजवलेले मक्याचे दाणे, कोथिंंबीर, मीठ, लिंबू रस, मिरे पावडर, चाट मसाला, टोमॅटो घालून मिक्स करून घ्यावे.
गरम गरम सर्व्ह केले तर छान लागते. सर्व्ह करतांना मक्याच्या दाण्यावर कांदा, टोमॅटोने सजवावे. वरतून मिरे पावडर, चाट मसाला भूर भुरावी.



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - गाजर हलवा




नमस्कार 


मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा
आज आपण बघुया गाजर हलवा

साहित्य:
२ वाट्या गाजराचा कीस
१ वाटी साखर (कमी जास्त आवडीनुसार )
१ लिटर दुध
१/२ वाटी खवा
२ चमचा वेलचीपूड
१/२चमचा जायफळ पूड
बदाम काप पातळ
काजू
२चमचे तूप

कृती:
१) एका पातेल्यात दुध उकळत ठेवावे
२) एका कढईत गाजराचा कीस घालून वाटीभर दुध घालावे .
३) एक वाफ आली कि परत एक वाटी दुध घालावे . असे करत थोडे थोडे दुध घालत गाजर शिजवून घ्यावे . नंतर खवा घालून ढवळावे . साखर घालावी परत परतत राहावे . ४)तूप सोडावे परत एकजीव करून परतावे . वेलचीपूड आवडत असल्यास जायफळ पूड घालावी .
५)बदाम काप घालून उतरवावे . गरम जास्त छान लागतो . तूप व दुधाची साय घालूनही वाढता येते.


 

मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - तिसऱ्या मसाला




नमस्कार 


आज आपण बघुया तिसऱ्या मसाला .
तिसऱ्या म्हणजेच शिंपल्या .
चला तर बघुया

साहित्य :
१वाटा शिंपल्या (अंदाजे ४०-५० शिंपले )
२ बारीक चिरलेला कांदा
३/४ वाटी ओलं खोबरं
१ १/२ चमचा मालवणी मसाला
१/२ चमचा हळद
४-५ पाकळ्या लसूण
पाव इंच आलं
१ हिरवी मिरची
२-३ आमसुलं
तेल
पाणी

कृती :
१)तिस-या स्वच्छ धुवून गॅस वर थोडं पाणी घालून उकडत ठेवा ५-१०मिनिटांनी त्यांची तोंड आपोआप उघडतील.
२)तिस-या साफ करताना उघडलेले शिंपल्यांची एक बाजू माष्टा सकट तशीच ठेवा. दुस-या बाजूला लागलेले माष्टं काढून घ्या आणि तो शिंपला फेकून द्या.
३)अर्धे शिंपले माष्टं पूर्ण काढून घेऊन फेकून द्या. काही वेळेला शिंपल्यांच्या आतमध्ये छोटे खेकडे नि माती असताते ते काढून फेकून द्या.
४)कढईत तेल गरम करून कांदा परतून घ्या त्यात खोबरं पण चांगलं भाजून घ्या
भाजलेलं कांदा खोबरं,लसूण, आलं,कोथिंबीर, मिरचीआणि थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या
५) एका पातेल्यात २पळी तेल घालून त्यात बारीक कांदयाची फोडणी करून घ्या
६)मालवणी मसाला ,हळद आणि वाटलेलं वाटण घाला ऐक उकळी आलीकी त्यात कोकम आणि शिंपले घाला
सगळं चांगलं एकजीव करून उकळी काढून घ्या
वरून कोथिंबीर घालावी 




मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - शेगदाण्याची चटणी





नमस्कार 

आज आपण बघुया शेगदाण्याची चटणी

साहित्य:
१/२वाटी शेंगदाणे (भाजून सालासकट)
१/३ वाटी भाजलेले तिळ
१/४ वाटी भाजलेला खोबऱ्याचा किस
१ चमचा आमचूर पावडर
५-६ लाल सुक्या मिरच्या
तेल
मिठ

कृती:
१) शेंगदाणे खमंग भाजावेत. भाजलेल्या शेंगदाण्याच्या सालांचा एक छान स्वाद असतो. जर नको असेल तर साले काढून टाकावीत.
२) १/३ वाटी भाजलेले तिळ घ्यावे.
३) सुक्या मिरच्या तोडून घ्याव्यात जर तिखटपणा कमी हवा असेल तर त्यातील बिया काढून टाकाव्यात. १ चमचा तेलावर त्या थोड्या भाजून घ्याव्यात.
४)खोबऱ्याचा किस भाजून घ्यावा.
५) सर्व जिन्नस वरील प्रमाणात एकत्र करून मिक्सरवर बारीक वाटून चटणी बनवावी.



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - डाळ पालक




नमस्कार 


आज आपण बघुया डाळ पालक

साहित्य:
१ जुडी पालक
१/२ वाटी तुरीची डाळ
१ मध्यम बारीक चिरलेला कांदा
१टोमॅटो बारीक चिरलेला
५-६ लसूण पाकळ्या चिरून
१ चमचा लाल तिखट
१/४ चमचा हळद
१/२ चमचा धनेपूड
१/२ चमचा जिरेपूड
तेल

कृती:
१)कुकरमध्ये पाणी घालून डाळ शिजवून घ्या. कुकर थंड झाला कि डाळ घोटून घ्या. पालक बारीक चिरून ठेवा.
२)पातेल्यात चमचे तेल गरम करा. लसूण फोडणीला घाला. कांदा परतून घ्या.
३)२-३ मिनिटे कांदा परता मग त्यात हळद, लाल तिखट ,धने-जिरेपूड घालून परता.
४) घोटलेली डाळ घाला. मीठ, साखर आणि टोमॅटो घालून ढवळा.
५) डाळ खूप जाड असेल तर थोडेसे पाणी घालून पात्तळ करा.
३-४ मिनिटे उकळत ठेवा.
६)चिरलेला पालक घालून ढवळा. २-३ मिनिटे उकळा.
७) गरम गरम डाल पालक भातावर किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा.

टीप :
आंबट पणा येण्यासाठी आमचूर पावडर किंवा चिंच घातली तरी चालेल. पालक कुकरमध्ये डाळीबरोबर शिजवल्यास किंवा सर्वात आधी घातल्यास पालकाचा हिरवा रंग बदलतो आणि त्यातली जीवनसत्त्वं कमी होतात. डाळ-पालक जेवायच्या खूप आधी करून ठेवले तर न झाकता तसेच ठेवा. म्हणजे पालकाचा रंग बदलणार नाही.
 



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/