postbox media

Thursday, 3 October 2019

खाद्यसंस्कृती - बटाटा वेफर्स





नमस्कार 


आज आपण बघुया बटाटा वेफर्स

साहित्य :
८/१० मध्यम आकाराचे बटाटे
थोडे मीठ
चिमुटभर तुरटी
पाणी चार वाटी

कृती :
१)८/१० वेळा पाण्याने बटाटे स्वच्छ धुवून घ्यावेत. त्याची साले काढून घ्यावी. पुन्हा धुवा.वेफर्सच्या किसणीवर त्याच्या काचऱ्या करून त्या पाणी असलेल्या पातेल्यात टाका. २)तुरटीची पूड करून तिची गरम तव्यावर लाही करून घ्या. एका पातेल्यात पाणी उकळत घाला. पाणी उकळू लागले की त्यात तुरटीची लाही व मीठ घाला.
३)आता काचऱ्या पाण्यातून काढा. त्याचे पाणी दाबून काढा. या काचऱ्या उकळलेल्या पाण्यात घाला. झाल्याने हालवा. ४)काचऱ्या वर येऊ लागल्या की त्या चाळणीत ठेवाव्यात त्यातील पाणी निथळून जाते. मग या काचऱ्या (काप) प्लॅस्टिकच्या कागदावर चांगले कडकडीत/खडखडीत वाळवून घ्यावेत. कधीही तळून खाऊ शकता. असे काप वर्षभरसुद्धा टिकू शकतात.







मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - मसूर ची बिर्याणी






नमस्कार 

आज आपण बघुया मसूर ची बिर्याणी

साहित्य:
::भातासाठी ::
दिड पेला बासमती तांदूळ
३ पेले गरम पाणी
१ चक्री फूल
२ तमालपत्र
2 लवंगा
१ चमचा तूप
१/२चमचा मिठ
::मसूर ग्रेवी ::
१/२ वाटी मसूर
१ चमचा तूप
२ वेलची
२-३ काळी मिरी
१/४ चमचा हळद
१ चमचा लाल काश्मिरी तिखट
१ बारीक चिरलेला कांदा
२ चमचे आलं लसूण पेस्ट
१/२ वाटी दही
१ १/२ चमचा धणेजिरंपूड
१ चमचा गरम मसाला
चवीपुरते मिठ

कृती:
१) मसूर रात्रभर किंवा ७ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवावे. कूकरमध्ये १ शिट्टी करून मसूर पाणी ना घालता शिजवून घ्यावे. शिजवताना थोडे मिठ घालावे.
२) पॅनमध्ये तूप गरम करून त्यात वेलची आणि मिरी घालावी आणि परतावे. हळद, लाल तिखट आणि आलेलसूण पेस्ट घालून परतावे. कांदा घालून पारदर्शक होईतोवर परतावे.
३) आता शिजलेले मसूर आणि १/२ पेला पाणी घालावे. थोडेसेच मिठ घालावे कारण आधी मसूर शिजताना मिठ घातले होते. थोडा वेळ शिजू द्यावे. आता गरम मसाला, धणे-जिरेपूड घालून एकजीव करावे. चव पाहून गरजेनुसार मसाला घालावा. गॅसवरून बाजूला काढावे. ही ग्रेव्ही घट्टसरच असावी कारण थंड झाल्यावर यात नंतर दही घालायचे आहे.
४) ग्रेव्ही जरा गार झाली की त्यात घोटलेले दही घालून निट मिकस करावे. लागल्यास थोडे मिठ घालावे.
५) बासमती तांदूळ १० मिनीटे पाण्यात भिजवून ठेवावा. नंतर पाणी काढून टाकावे आणि तांदूळ २० मिनिट्स निथळत ठेवावा.
६) एक मिडीयम पॅन गरम करावा. त्यात तूप घालून वितळू द्यावे. चक्री फुल, तमालपत्र, आणि लवंगा घालून परतावे. निथळलेला तांदूळ घालून चांगला कोरडा होईस्तोवर परतावे.
७) तांदूळ चांगला परतला गेला की गरम पाणी घालून ढवळून झाकण न ठेवता मोठ्या आचेवर उकळू द्यावे. भाताच्या पृष्ठभागावर पाणी दिसायचे बंद झाले कि लगेच आच लहान करावी आणि झाकण ठेवून भाताला वाफ काढावी. भात नीट शिजू द्यावा.
शिजलेला भात थोडावेळ तसाच ठेवावा. कारण गरम भातात ग्रेव्ही मिक्स केली तर भाताची शीते मोडतील.
८) थोडे तूप घालून मिक्स करावे. आणि १० मिनीटे एकदम मंद आचेवर झाकण ठेवून भात गरम होऊ द्यावा.

टीप :-
१) तांदूळ मोठ्या आचेवर ६ ते ८ मिनीटे भाजल्याने भात मोकळा होतो.
२) जर मसूर भिजावायला जास्त वेळ नसेल तर २ तास एकदम गरम पाण्यात मसूर भिजवावेत.
३) तूप जर कमी वापरायचे असल्यास ग्रेव्ही तेलात बनवावी आणि शेवटी जे तूप घालायचे आहे ते घालू नये.





मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - फ्रेंच टोस्ट





नमस्कार,


आज आपण बघुया फ्रेंच टोस्ट

साहित्य:
४ ब्रेडचे स्लाइस
२ अंडी
१/२ बारीक चिरलेला कांदा
१/४ चमचा हळद
१ चमचा चीज
१ हिरवी मिरची
१ चिमुट मिरपूड
१ चमचा बटर

कृती :
१. अंडी फोडून फेटून घ्या.त्यात कांदा हिरवी मिरची (बारीक चिरून),मिरपूड , चीज ,हळद आणि मीठ घालून नीट एकजीव करा.
२. ब्रेडच्या स्लाइसवर चमच्याने मिश्रण पसरावा. तव्यावर १ टीस्पून बटर गरम करा. आणि ज्या बाजूला अंड लावलय ती बाजू तव्यावर टाकून १- २ मिनिटे फ्राय करा. ती बाजू फ्राय होताना स्लाइस च्या दुस-या बाजूला वरून अंड्याचे मिश्रण चमच्याने लावा. खालची बाजू व्यवस्थित फ्राय झाली कि स्लाइस उलटी करून ती बाजू फ्राय करा. बाजूने थोडं बटर सोडा.
३. स्लाइसच्या दोन्ही बाजू व्यवस्थित फ्राय करून फ्रेंच टोस्ट टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.







मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - पालक राईस





नमस्कार 

आज आपण बघुया पालक राईस

साहित्य:
३/४ पेला बासमती तांदूळ
१ जुडी बारीक चिरलेली पालकाची पाने
१/२ पेला पाणी
३/४ पेला गरम पाणी
१ चमचा बटर
१ चमचा बारीक चिरलेले आले
१ चमचा बारीक चिरलेले लसूण
१ बारीक चिरलेला कांदा
१ लहान हिरवी मिरची
आख्खे गरम मसाले - २ तमालप्रत्र, १ हिरवी वेलची, २ लवंगा
चवीपुरते मिठ

कृती:
१) तांदूळ साध्या पाण्यात १० मिनीटे भिजवून ठेवावा. १० मिनीटांनी पाणी काढून टाकावे. आणि हा तांदूळ १० मिनीटे निथळत ठेवावा.
२) १/२ पेला साधं पाणी आणि पालक एकत्र करून बारीक प्युरी करून घ्यावी.
३) नॉनस्टीक पॅनमध्ये १ चमचा बटर किंवा तूप गरम करावे. त्यात जिरे आणि आख्खे मसाले घालावे. ५ ते १० सेकंद परतून आले-लसूण आणि मिरची घालावी. कांदा घालून परतावा.
४) निथळत ठेवलेला तांदूळ आता घालून व्यवस्थित कोरडा होईस्तोवर परतावा. सतत परतत राहा म्हणजे तांदूळ जळणार नाही. तांदूळ पूर्ण कोरडा झाला पाहिजे आणि व्यवस्थित भाजला गेला पाहिजे.
५) ३/४ कप गरम पाणी, मिठ आणि पालकाची प्युरी घालून मोठ्या आचेवर भात शिजू द्यावा. भाताच्या पृष्ठभागावर (सरफेस) पाणी दिसायचे बंद झाले कि लगेच आच मिडीयम आणि लो च्यामध्यावर ठेवावी आणि पॅनवर झाकण ठेवावे. साधारण १० मिनीटे वाफ काढावी.

टीपा:
१) भात अधिक पौष्टिक बनवण्यासाठी मटार, गाजर, फरसबी अशा भाज्याही घालू शकतो.त्याच प्रमाणे काजूपं घालू शकतो.
२) तांदूळ चांगला भाजला गेल्याने भात मोकळा होतो. तसेच भात मोकळा होण्यासाठी गरम पाणी वापरावे.
 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - अंडा बुर्जी





नमस्कार 


आज आपण बघुया अंडा बुर्जी

साहित्य :-
२ अंडी
१टोमॅटो
२कांदे बारीक चिरलेले
१/२ चमचा गरम मसाला
१/४ चमचा लाल तिखट
१/२ चमचा हळद
कोथिंबीर
मीठ
तेल

कृती :-
१)एक मोठा चमचा तेल टाकून कांदा चांगला परतून घ्यावा
२)नंतर टोमॅटो ,हळद , लाल तिखट , चवीला मीठ , गरम मसाला टाकून परतावे .
३) नंतर फेसलेली अंडी हळूहळू टाकून एकसारखे ढवळत राहावे . अंडे शिजले की कोथिंबीर टाकावी .
 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - चिकू मिल्कशेक





 नमस्कार 


 बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आज आपण बघूया चिकू मिल्कशेक

साहित्य:
५-६ चिकूच्या मध्यम फोडी
१ कप दुध (शक्यतो थंड)
२ ते ३ चमचे साखर

कृती:
१) चिकूच्या देठाकडील भाग कापावा. चिकू सोलून त्याचे दोन भाग करावे. बिया काढाव्यात. आणि मधोमध असलेला पांढरट भाग कोरून काढावा. (हा पांढरट भाग थोडा चिकट असतो. आणि शेक पिताना कधीकधी तोंडाला चिकटा बसतो). आता चिकूच्या फोडी कराव्यात.
२) चिकूच्या फोडी साखरआणि थोडे दुध मिक्सरमध्ये घालावेआणि वाटून घ्यावे. चिकूची प्युरी झाली कि उरलेले दूधही घालावे, आणि मिक्सरवर बारीक करावे. (मिल्कशेक कितपत घट्ट हवा असेल त्यानुसार दुधाचे प्रमाण कमीजास्त करावे.)
३) मिल्कशेक फ्रीजमध्ये ठेवून ३-४ तासांनी सर्व्ह करावा.

टीप:
१) थंडगार दुध घालून शेक बनवला तर लगेच सर्व्ह करता येईल.





मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - आवळा कॅन्डी





नमस्कार 

आज आपण बघूया आवळा कॅन्डी

साहित्य:
२० आवळे
साखर

कृती:
१) आवळे पाणी न घालता कुकरमध्ये शिजवून घ्यावे.
२) आवळे चाळणीवर ठेवून पाणी निथळून घ्यावे. हे पाणी टाकून देऊ नये. आवळे हाताळण्यायोग्य झाले कि त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून बिया काढून टाकाव्यात
३) आवळ्याच्या फोडीना भरडलेली साखर लावावीआणि उन्हात ३-४ दिवस वाळवावे
४) वाळलेल्या फोडी प्लास्टिकच्या बरणीत भरून ठेवाव्यात.

टीपा:
१) फोडी जर नीट वाळल्या नाहीत तर टिकत नाहीत.
 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - अंडा करी




नमस्कार 

आज आपण बघुया अंडा करी

साहित्य :
४ अंडी
वाटणासाठी -
१ मध्यम कांदा (उभा चिरलेला) + १/२ वाटी सुकं खोबरं
२कांदे बारीक चिरलेले
१ चमचा आलं-लसूण पेस्ट
१ १/२चमचा मालवणी मसाला
१ टोमॅटो चिरलेला
१/२ चमचा हळद
तेल
पाणी
मीठ

कृती :
१. १ चमचा तेलात कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. मग त्यात सुकं खोबरं ब्राऊन होई पर्यंत खरपूस भाजून घ्या. मिश्रण थंड झालं कि थोडं पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
२. एकीकडे ३ अंडी पाण्यात घालून उकडून घ्या. १ अंड नंतर ग्रेवीमध्ये वापरण्यासाठी बाजूला राहू दे .
३. पातेल्यात तेल गरम करा आणि बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात टोमॅटो घालून परता. आलं-लसूण पेस्ट, हळद आणि मसाला घाला आणि तेल सुटेपर्यंत परता.
४. वाटलेला मसाला घालून परता. आवडीप्रमाणे पाणी घालून थोडं पात्तळ करा. १ अंड फोडून घाला आणि अलगद मिक्स करा. वरून झाकण ठेवा. अंड शिजू दे.
५.मग उकडलेल्या अंड्यांना वरून ३/४ कापून करी मध्ये सोडा. वरून झाकण ठेऊन १ उकळी काढा.
६. कोथिंबीर पेरून सर्व्ह करा.

 

मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - भोपळ्याचे भरीत




नमस्कार,



आज आपण बघुया भोपळ्याचे भरीत

साहित्य:
पाव किलो लाल भोपळ्याच्या मध्यम फोडी (साल काढून)
१/२ चमचा तूप
१/२ चमचा जिरे
३ हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या
१/४ वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली
५-६ पाने कडीपत्ता
१पेला दही
मिठ
साखर

कृती:
१) भोपळ्याच्या फोडी कूकरमध्ये उकडून घ्याव्यात. थंड झाल्यावर चमच्याने मॅश करून घ्याव्यात. खुप गुठळ्या राहू देवू नये.
२) लहान कढईत तूप गरम करावे. तूप गरम झाले कि जिरे,कडीपत्ता आणि मिरच्या घालून फोडणी करून उकडलेल्या भोपळा त्यात घालावा.आणि गॅस बंद करावा चवीनुसार मिठ आणि किंचीत साखर घालावी. दही आणि कोथिंबीर घालून निट एकजीव करावे.

टीप:
१) हे भरीत उपवासालाही चालते. उपवासाव्यतिरिक्त दिवशी फोडणीत हळद, हिंग, राई घातली तरी चालते.
२) शेंगदाण्याचा कूट घातल्यास चव छान येते.
 



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - चिकन फ्राय




नमस्कार,


आज आपण बघुया झटपट चिकन फ्राय

साहित्य-
अर्धा किलो चिकनचे छोटे तुकडे किंवा बोनलेस चिकन
१लिंबू
२चमचे मिरची पावडर
१चमचा धणे पावडर
१/२ चमचा हळद
१ चमचा आलं लसूण पेस्ट
२चमचे बेसन किंवा कॉर्नफ्लोअर
मीठ
तेल

कृती-
१)चिकन स्वछ धुवून घ्या.
चिकनला लिंबू ,आलं लसूनपेस्ट व मीठ लावून अर्धा तास मॅरीनेट करून ठेवावे. त्यानंतर वरील सर्व मसाले टाकावेत.
२)एका पॅन मध्ये तेल घेऊन त्यात चिकन फ्राय करून घ्यावे हे सर्व करतांना त्यावर लिंबू व चाट मसाला टाकून गरम गरम सव्‍‌र्ह करावे.
 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/