postbox media

Wednesday, 2 October 2019

खाद्यसंस्कृती - चकली



 
नमस्कार 

आज आपण बघुया चकली

साहित्य:-
★भाजणी तयार करण्यासाठी
४ वाट्या तांदूळ
२ वाट्या चणाडाळ
१ वाटी उडीद डाळ
१/२ वाटी मूगडाळ
अर्धी-पाऊण वाटी जिरं
पाव वाटी धणे

कृती :-
१)तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घ्यावेत. सुती कपड्यावर वाळत घालावेत.
२)एका कढईत हे सगळे जिन्नस मंद आचेवर वेगवेगळे छान खमंग भाजून घेऊन बारीक दळून आणावे

★चकली साठी
साहित्य:-
१ पेला चकलीची भाजणी
१ पेला पाणी
१ चमचा हिंग
२ चमचा पांढरे तिळ
१/२चमचा ओवा
१ चमचा लाल तिखट
तेल
मिठ

कृती:
१) एका पातेल्यात१ पेला पाणी उकळत ठेवावे. त्यात हिंग, लाल तिखट,१चमचा तेल, ओवा, पांढरे तिळ आणि मीठ घालून ढवळावे.
२) पाणी उकळले कि गॅस बंद करावा, चकलीची भाजणी घालावी आणि ढवळावे. ७-८ मिनीटे झाकून ठेवावे.
३) कोमट पाण्याचा हात लावून पिठ मळावे.
४) चकलीच्या सोर्याला आतून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ चिकटणार नाही. सोर्यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरून चकल्या पाडाव्यात. मध्यम आचेवर चकल्या तळून घ्याव्यात.

टीप:-
काहीवेळा चकली बनवता थोडी गडबड झाली की त्या तुटतात की फसतात आशा वेळी
★चकल्या नरम पडण्याची कारणे
१)भाजणीचे साहित्य भाजताना कमी भाजले गेले तर - सर्व जिन्नस व्यवस्थित खमंग भाजावे.
२)मोहन कमी झाले तर - उकडीवर थोड्या तेलाचे मोहन घालावे आणि मळून चकल्या कराव्यात.
३) चकल्या मध्यम आचेवर तळाव्यात.
४)चकलीच्या भाजणीची उकड गार पाण्याने मळल्यास - भाजणीची उकड मळताना नेहमी गरम किंवा कोमट पाण्याने मळावी.
५)चकलीचे पिठ गरजेपेक्षा नरम भिजवल्यास - अशावेळी थोडी कोरडी भाजणी घालावी. मळून परत चकली करावी.
६)चकली तेलातून लगेच काढल्यास - चकल्या तेलात टाकल्यावर आधी बरेच बुडबूडे येतात नंतर बुडबूडे बंद होवून चकली थोडी खाली बसायला लागेल अशावेळी चकली झाली असे समजावे. त्याआधी चकली तेलातून काढू नये.
★चकल्या तुटण्याची कारणे:-
चकल्या पाडताना तुटत असतील म्हणजे पिठ गरजेपेक्षा जास्त घट्ट मळले गेले आहे - गरम पाण्याचा हात घेऊन भाजणीची उकड किंचीत मऊ मळावी.

★चकल्या तेलात घातल्यावर विरघळण्याची कारणे:-
पिठात मोहन जास्त झाले तर - थोडी भाजणीची उकड काढावी (तेल न घालता), आधी मळलेल्या पिठाचा थोडा भाग घेऊन त्यात मिक्स करावे आणि त्याच्या चकल्या करून पाहाव्यात.



मायरा वैभव जगताप  
https://www.aapalimayra.blogspot.com/ 

खाद्यसंस्कृती - चिरोटे


 https://www.aapalimayra.blogspot.com/


दिवाळीच्या फराळा मधला माझा सर्वात आवडता गोडाचा पदार्थ सांगणार आहे .
आज आपण बघुया चिरोटे

साहित्य:-
२वाट्या मैदा
२वाटी पिठी साखर
ड्रायफ्रूट ची भरड
१/२चमचा वेलची पूड
★साटा-
३ चमचे तूप
२ चमचे कॉर्न फ्लोअर
२चमचे कॉर्नफ्लोअर/तांदुळ पीठ
तूप तळण्यासाठी

कृती:-
१)एका परातीत मैदा चाळून घ्यावा त्यात चिमूटभर मीठ आणि २-३चमचे कडकडीत तुपाचे मोहन घालावे
आणि पीठ मळून घ्यावे १५-२०मिनिटे झाकून ठेवावे
२)साटा तयार करण्या करता एका ताटात ३चमचे तूप घेऊन हाताने ते चांगले फेटून घ्यावे त्यात २चमचे कॉर्नफ्लोअर किंवा तांदुळपीठ घालून पेस्ट करून घ्यावी
३)मळलेल्या पिठाचे ३-४गोळे करा आणि त्याच्या पोळ्या लाटून घ्या.
४)एक पोळी घ्या त्याच्यावर बोटाने दाब देऊन खळगे करून घ्या आणि त्यावर साटा लावून घ्या हीच कृती बाकी च्या पोळ्याना पण करावी (एका वर एक ठेवावे) आणि त्याची गुंडाळी करून घ्यावी आणि सुरीने त्याचे काप करून घ्यावे
५)हलक्या हाताने छोट्या पुऱ्या लाटून घ्या आणि गरम तुपात तळून घ्या.
६)त्याला छान पापुद्रे फुटतील .थोडा रंग बदलला की बाहेर काढा आणि त्यावर पिठी साखर आणि वेलचीे पूड भुरभुरावी
आणि वरून ड्रायफ्रूट ची भरड घालावी

टीप:-
१)चिरोट्याला रंग जरी वापरला तरी खूप छान दिसतात
२)पिठाचे वेगळे वेगळे गोळे करून त्यात खायचा रंग घालावा






मायरा वैभव जगताप 
https://www.aapalimayra.blogspot.com/ 

खाद्यसंस्कृती - पोह्याचा चिवडा




नमस्कार,

 
चला तर आपण बघुया पोह्याचा चिवडा

साहित्य:
१/२किलो पातळ पोहे
१ /२वाटी शेंगदाणे
१/२वाटी भाजलेली डाळ
१/२वाटी सुक्याखोबर्याचे पातळ काप
१०-१२ काजू
१०-१२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१०-१२ कढीपत्ताची पाने
९-१० लसूण पाकळी ठेलचलेली किंवा बारीक केलेला
१/२ चमचा हिंग
१ चमचा हळद
१चमचा धणे जिरं पूड
१/२ चमचा मोहोरी
१/२ चमचा जिरं
१/२ चमचा खसखस
मीठ
साखर
तेल

कृती:-
१) प्रथम पोहे थोडे हलकेसे भाजून घ्या
२)पातेल्यात ४-५पळी तेल गरम करावे. सर्वात आधी शेंगदाणे, काजू ,खोबऱ्याचे काप,डाळ,थोडे तळून घ्यावेत. आणि एका वाडग्यात बाजूलाकाढून ठेवावेत.
३) त्याच तेलात राई, जिरं, हिंग, लसूण, मिरची आणि कडीपत्ता घालून फोडणी करावी. नंतर तीळ,खसखस,धणे जिरंपूड,हळद,मीठ घालावे तळलेले शेंगदाणे, काजू,खोबऱ्याचे काप,डाळ घालून लगेच पोहे घालावे आणि सर्व पोह्यांना तेल लागेल असे ते एकजीव करून घ्यावे . हे करताना गॅस बारीक ठेवावा. नाहीतर तळाला पोहे जळू शकतात.
४) गॅस बंद करून चमचाभर साखर घालावी. आणि परत व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.



 मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/ 

खाद्यसंस्कृती - शंकरपाळी





नमस्कार,

आज आपण बघुया झटपट बनणारी शंकरपाळी

साहित्य:-
पाव किलो मैदा
१वाटी साखर
१वाटी पाणी
१वाटी तूप
चिमूटभर मीठ
तेल/तूप तळण्यासाठी

कृती:-
१) प्रथम एका भांड्यात पाणी ,तूप आणि साखर घेऊन गॅस वर ठेऊन गरम करा . साखर विरघळली आणि एक उकळी आली की गॅस बंद करा
२)एका परातीत हे पाणी ओतून ठेवा .पाणी गार झालं की चिमूटभर मीठ आणि मैदा घाला आणि पीठ मळून घ्या
मैदा बनवलेल्या पाण्यात जेवढा लागेल तेवढा घालावा
मी पाव किलो सांगितलं आहे पण कमी जास्त पण लागू शकतो .पीठ थोडं मऊसर मळावे
३) मळलेल्या पिठाला तेलाचा हात लावून १०-१५ मिनिटे झाकून ठेवा
४)पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करून चपाती सारखे लाटावे आणि कातणाने त्याचे शंकरपाळे पाडावेत. आणि तूपात किंवा तेलात सोनेरी रंगावर तळून काढावेत.






मायरा वैभव जगताप 
https://www.aapalimayra.blogspot.com/ 

खाद्यसंस्कृती - बांगडा फ्राय






नमस्कार, आज आपण बघुया बांगडा फ्राय

साहित्य:-
४ बांगडे
मसाला / तिखट
१/२ चमचा आलं लसूण पेस्ट
१/२ चमचा हळद
३ चमचे रवा
२ चमचे तांदळाचे पीठ
२ चमचे कोकमाचे आगुळ
तेल
मीठ

कृती:-
१)प्रथम बांगडा साफ करून धुवून घ्या. नंतर बांगड्याला सुरीने आडव्या चिरा द्या.
२)कोकमाचा आगुळ, आलं लसूण पेस्ट,तिखट, हळद, चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र करून बांगडयास १५ मिनिटे लावून ठेवावे.
३) बारीक रवा, तांदळाचे पीठ, चिमुटभर हळद, २ टेबलस्पून तिखट, चवीनुसार मीठ या सर्वांचे सुके मिश्रण तयार करून बांगडयास लावून, बांगडे नॉन स्टीक तव्यामध्ये दोन्ही बाजूने १०-१५मिनिटे मंद आचेवर तळून घ्यावेत.

टीप:-
१) मसाल्याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात.
२) खोबरेल तेलात बांगडा तळाला की अजून स्वादिष्ट लागतो 



मायरा वैभव जगताप 
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - पनीर भुर्जी






नमस्कार


आज आपण बघुया पनीर भुर्जी

साहित्य:-
१००ग्रॅम पनीर
२ ते ३ मध्यम कांदे बारीक चिरलेले
२ ते ३ टोमॅटो बारीक चिरलेले
१ चमचा आले-लसूण पेस्ट
१/२चमचा हळद ,
१/२चमचा लाल तिखट
१/२चमचा गरम मसाला
कोथिंबीर
तेल
मीठ

कृती :-

१)एका पातेल्यात २-३चमचे तेल घेऊन तेलात कांदा नरम करावा. त्यात आले-लसूण पेस्ट टाकून चांगले परतून घ्यावे . नंतर टोमॅटो टाकून परतून घ्यावे .
२) टोमॅटो नरम झाला की त्यात हळद ,लाल तिखट , गरम मसाला,थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकावे .
३)पनीर बारीक कुस्करून त्यात टाकावे व चांगले परतून एक वाफ काढावी . वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी .
आपली पनीर भुर्जी तयार.



मायरा वैभव जगताप 
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - मालवणी कोंबडी रस्सा


 
नमस्कार,

आज आपण बघणार आहोत मालवणी कोंबडी रस्सा

साहित्य :
६०० ग्रॅम चिकन
मॅरीनेट करण्यासाठी मसाला-
१/२" आलं
१०-१२ लसूण पाकळ्या
१/२ वाटी कोथिंबीर
१/२ चमचा हळद
१/४ चमचा गरम मसाला
★रश्याच्या वाटणासाठी मसाला -
१ मध्यम कांदा उभा चिरून
१/२ वाटी सुकं खोबरं
२ चमचे धणे
१/४ चमचा शहाजिरे
८-१० मिरी
४ लवंग
१ वेलची
२" दालचिनी
१ मध्यम कांदा बारीक चिरून
१/२ वाटी टोमॅटो प्युरी
२ चमचा मालवणी मसाला
मीठ
कोथिंबीर

कृती :
१)प्रथम चिकन २-३ पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या.आले-लसूण-कोथिंबीर मिक्सर वर बारीक वाटून घ्या. चिकनला हि पेस्ट ,हळद, गरम मसाला आणि मीठ लावून फ्रीज मध्ये ४-५ तास मॅरीनेट करून ठेवा.
२)एका पातेल्यात १चमचा तेलात उभा चिरलेला कांदा, धने, शहाजिरे, मिरी,लवंग,दालचिनी आणि वेलची परता. कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावर सुकं खोबरं घालून ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या.
३) मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरवर थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्या.
४) पातेल्यात तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर परता. २ चमचे मालवणी मसाला घाला. मॅरीनेट केलेले चिकन घालून परता.
५) त्यात १ वाटी पाणी घाला. १०-१५ मिनिटे चिकन चांगले शिजू द्या. चिकन शिजले कि नंतर टोमॅटो प्युरी घाला. वाटण घालून सगळं नीट एकजीव करा.
६) गरज असेल तर आणखीन मीठ घालून १ उकळी काढा. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
आपला मालवणी कोंबडी रस्सा तयार

टीप :
हे चिकन तांदळाच्या भाकरी बरोबर किंवा मालवणी कोंबडी वड्याबरोबर छान लागते. 






मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/ 



Tuesday, 1 October 2019

खाद्यसंस्कृती - श्रीखंड




नमस्कार 

 तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
आज आपण बघुया दसऱ्यासाठी खास श्रीखंड

साहित्य:
१०० ते १५० ग्राम चक्का (दह्यापासून) (साधारण सव्वा वाटी)
१/२ वाटी पिठी साखर (साधारण १०० ते १५० ग्राम)
१/२ चमचा वेलचीपूड
१/२ चमचा चारोळी
१ चमचा पिस्त्याचे काप
१ चमचा बदामाचे पातळ काप सजावटीसाठी
बारीक जाळीचे मोठे गाळणे किंवा चाळणी

कृती:
१) एका भांड्यात चक्का घ्यावा. त्यात साखर घालावी आणि निट एकजीव करून घ्यावे.
२) चाळणी/ गाळणे
बारीक जाळीची चाळणी किंवा गाळणे घेऊन त्यात चक्क्याचे मिश्रण घालून चमच्याने दाब देऊन चाळणीतून गाळून काढावे, म्हणजे रवाळपणा निघून जाईल, तसेच साखर आणि चक्का चांगला एकजीव होईल.
३) गाळलेल्या तयार श्रीखंडात वेलचीपूड, चारोळ्या, पिस्ता, आणि बदाम घालून व्यवस्थित एकजीव करावे. तयार श्रिखंड सर्व्हींग बोलमध्ये काढून फ्रिजमध्ये ठेवावे.
थंडगार श्रीखंड पुरीबरोबर सर्व्ह करावे.

टीप:
१) चवीनुसार साखरेचे प्रमाण कमीजास्त करावे.
२) श्रीखंडाला पिवळसर रंग येण्यासाठी अगदी चिमुटभर केशरी रंग वापरावा. किंवा केशराच्या ३ ते ४ काड्या २ चमचे दुधात मिक्स करून या मिश्रणाचा रंग आणि स्वादासाठी वापर करावा.
३) जर चक्का घरी बनवणार असाल तर चांगल्या प्रतीचे ऑर्गॅनिक दही वापरा. आणि पाण्याचा अंश काढून टाका.





 वैभव जगताप 

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - उपवासाची कचोरी






नमस्कार


आज आपण बघुया उपवासाची कचोरी

साहित्य :-
पारी साठी
४-५ मोठे उकडलेले बटाटे किसून घ्यावे
२ चमचे साबुदाणा पीठ
मीठ

सारणा साठी :-
२ वाटीओला खवलेला नारळ
१/२ वाटी कोथंबीर बारीक चिरलेली
३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१०-१२काजू तुकडे केलेले
१०-१२ मनुका
१ चमचा लिंबू रस
मीठ
साखर
तूप /तेल

कृती: -
सारणा साठी :-
एका भांड्या खववलेला नारळ, कोथंबीर, हिरव्या मिरच्या, काजू,मनुका, लिंबू रस, चवीप्रमाणे मीठ व साखर घालून हेय सारण एकजीव करून घ्या .

पारी साठी :
एका ताटात किसलेला बटाटा घ्यावा . मग त्यामध्ये साबुदाणा पीठआणि थोडं मीठ घालून ते चांगलं मळून घ्या, मग त्याचे छोटे-छोटे गोळे बनवून त्यामध्ये नारळाचे सारण भरून गोळा बंद करा.
कढईमध्ये तूप/तेल गरम करून मंद आचेवर कचोऱ्या तळून घ्याव्यात.
आपल्या उपवासाच्या कचोऱ्या तयार

टीप:-
१)काही जण उपवासाला कोथिंबीर खात नाही तर ती नाही घातली तरी चालेल


 वैभव जगताप 

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - उपवासाचा डोसा

वैभव जगताप 

https://www.postboxmedia.wordpress.com



नमस्कार 

आज आपण बघुया उपवासाचा डोसा

साहित्य:-
१) चार वाट्या वरई (भगर),
२) एक वाटी साबुदाणा
३) गरजेनुसार मीठ

कृती :-
१) वरई (भगर) व साबुदाणा धुवून वेगवेगळे भिजत ठेवावे.
२) साधारणता दोन ते अडीच तासांनी मिक्सरवर वाटून घ्यावे व एकजीव करावे.
३) चवीनुसार मीठ घालावे.
४) मिश्रण सरसरित करून तव्यावर डोसा घाला.
आपला उपवासाचा डोसा तयार.


 https://www.postboxmedia.wordpress.com