postbox media

Tuesday, 1 October 2019

खाद्यसंस्कृती - श्रीखंड




नमस्कार 

 तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
आज आपण बघुया दसऱ्यासाठी खास श्रीखंड

साहित्य:
१०० ते १५० ग्राम चक्का (दह्यापासून) (साधारण सव्वा वाटी)
१/२ वाटी पिठी साखर (साधारण १०० ते १५० ग्राम)
१/२ चमचा वेलचीपूड
१/२ चमचा चारोळी
१ चमचा पिस्त्याचे काप
१ चमचा बदामाचे पातळ काप सजावटीसाठी
बारीक जाळीचे मोठे गाळणे किंवा चाळणी

कृती:
१) एका भांड्यात चक्का घ्यावा. त्यात साखर घालावी आणि निट एकजीव करून घ्यावे.
२) चाळणी/ गाळणे
बारीक जाळीची चाळणी किंवा गाळणे घेऊन त्यात चक्क्याचे मिश्रण घालून चमच्याने दाब देऊन चाळणीतून गाळून काढावे, म्हणजे रवाळपणा निघून जाईल, तसेच साखर आणि चक्का चांगला एकजीव होईल.
३) गाळलेल्या तयार श्रीखंडात वेलचीपूड, चारोळ्या, पिस्ता, आणि बदाम घालून व्यवस्थित एकजीव करावे. तयार श्रिखंड सर्व्हींग बोलमध्ये काढून फ्रिजमध्ये ठेवावे.
थंडगार श्रीखंड पुरीबरोबर सर्व्ह करावे.

टीप:
१) चवीनुसार साखरेचे प्रमाण कमीजास्त करावे.
२) श्रीखंडाला पिवळसर रंग येण्यासाठी अगदी चिमुटभर केशरी रंग वापरावा. किंवा केशराच्या ३ ते ४ काड्या २ चमचे दुधात मिक्स करून या मिश्रणाचा रंग आणि स्वादासाठी वापर करावा.
३) जर चक्का घरी बनवणार असाल तर चांगल्या प्रतीचे ऑर्गॅनिक दही वापरा. आणि पाण्याचा अंश काढून टाका.





 वैभव जगताप 

https://www.postboxmedia.wordpress.com

No comments:

Post a Comment