नमस्कार,
आज आपण बघणार आहोत मालवणी कोंबडी रस्सा
साहित्य :
६०० ग्रॅम चिकन
मॅरीनेट करण्यासाठी मसाला-
१/२" आलं
१०-१२ लसूण पाकळ्या
१/२ वाटी कोथिंबीर
१/२ चमचा हळद
१/४ चमचा गरम मसाला
★रश्याच्या वाटणासाठी मसाला -
१ मध्यम कांदा उभा चिरून
१/२ वाटी सुकं खोबरं
२ चमचे धणे
१/४ चमचा शहाजिरे
८-१० मिरी
४ लवंग
१ वेलची
२" दालचिनी
१ मध्यम कांदा बारीक चिरून
१/२ वाटी टोमॅटो प्युरी
२ चमचा मालवणी मसाला
मीठ
कोथिंबीर
कृती :
१)प्रथम चिकन २-३ पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या.आले-लसूण-कोथिंबीर मिक्सर वर बारीक वाटून घ्या. चिकनला हि पेस्ट ,हळद, गरम मसाला आणि मीठ लावून फ्रीज मध्ये ४-५ तास मॅरीनेट करून ठेवा.
२)एका पातेल्यात १चमचा तेलात उभा चिरलेला कांदा, धने, शहाजिरे, मिरी,लवंग,दालचिनी आणि वेलची परता. कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावर सुकं खोबरं घालून ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या.
३) मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरवर थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्या.
४) पातेल्यात तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर परता. २ चमचे मालवणी मसाला घाला. मॅरीनेट केलेले चिकन घालून परता.
५) त्यात १ वाटी पाणी घाला. १०-१५ मिनिटे चिकन चांगले शिजू द्या. चिकन शिजले कि नंतर टोमॅटो प्युरी घाला. वाटण घालून सगळं नीट एकजीव करा.
६) गरज असेल तर आणखीन मीठ घालून १ उकळी काढा. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
आपला मालवणी कोंबडी रस्सा तयार
टीप :
हे चिकन तांदळाच्या भाकरी बरोबर किंवा मालवणी कोंबडी वड्याबरोबर छान लागते.
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
No comments:
Post a Comment